Posts

Showing posts from June, 2023

ऐका पंढरीचे महिमान...

Image
            आज देवशयनी-आषाढी एकादशी! महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अलौकिक, सर्वांगसुंदर, दैदिप्यमान सोहळा म्हणजे पंढरपूरात टाळ-मृदंगाच्या निनादाने ओतप्रोत भरलेला वैष्णव वारकऱ्यांचा महोत्सव! महिनाभर पायी ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत पंढरीत आपल्या विठाईला भेटण्यासाठी भजन-भक्तीने भावविभोर झालेले वीर वारकरी आपल्या माहेरच्या अंगणात येऊन तुडुंब प्रेम कल्लोळात तल्लीन होऊन गाताहेत-नाचताहेत! वर्षभराच्या भेटीसाठी भावोत्कट वारकऱ्यांनी आज पंढरीला वेढा दिला असून भाव-भक्ती-भजन-प्रेमाची अक्षरशः लयलूट सुरु आहे! आजचा दिवस म्हणजे वारकऱ्यांसाठी महापर्वणी! मंदिरात पांडुरंगाचे दर्शन होणे शक्य नाही आणि त्यासाठी कुणी अट्टहास सुद्धा करत नाही. आज पंढरीत असणे म्हणजेच पांडुरंगाचे दर्शन! पंढरीरायाचा प्रेम भांडारी नामदेवराय आजचा आपला अनुभव ऐका पंढरीचें महिमान। राउळें तितुकें प्रमाण। तेथील तृण आणि पाषाण। तेहि देव जाणावे॥१॥ ऐसी पंढरी मनीं ध्याती। त्यांसी तिहीं लोकीं गति। ते आनिका तीर्था जाती। तीं वंदिती तयांसी॥२॥ वाराणसी चालिजे मासा। गोदावरी एक दिवसा। पं...

असा वेचला मनसोक्त प्राजक्त...

Image
  असा वेचला मनसोक्त प्राजक्त शांत सुरम्य मन प्रशांत पहाटे किलबिल कोकीळ गाते गाणे खुलला प्राजक्त सांडला दारात मन पाखरू होते सुगम तराने शुभ्र शुभ्र अशी पाकळी उमले बहरला हा केशर रंग पाठी देठ हर्ष उल्हासित असा उमलून येई तनामनाची अलौकिक गंध भेट असा बहरला प्राजक्त बावरा तव वर्षावात प्रेम येई बहरुन हृदयंगम पसरे मंद धुंद सुगंध जीवन, जगणे जातसे बावरून असा वेचला मनसोक्त प्राजक्त क्षण क्षण कसा मस्त जगण्याचा आनंदावा माणूस आसमंत सारा  सर्वोत्तम क्षण मंदिरी मागण्याचा प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी

फोटोची वाट पहात बसलेली कविता...!

Image
फोटोची वाट पहात बसलेली कविता...!                 मागील आठवड्यात जेष्ठ कादंबरीकार, कथाकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक आदरणीय गुरुवर्य श्री बाबाराव मुसळे सरांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विदर्भ साहित्य मंडळाने वाशीम येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला. या सुंदर कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गुरुवर्य प्रा.इंद्रजित भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सर्वच फोटो आदरणीय भालेराव गुरुजींनी मला पाठवून दिले आणि सर्व भाषणांचे व्हिडिओ आदरणीय मुसळे सरांनी त्यांच्या युटूब लिंकसह मला पाठवून दिले. फोटो आणि सर्व भाषणांच्या व्हिडिओत सृजनांचा गोड स्नेहमेळा जमलेला पाहून मन हर्षोल्हासाने बागडायला लागले. एकीकडे स्वतःच्या कोषात बंदिस्त असणारी माणसे आपल्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत असतांना इथे सृजनशील मनाची माणसं एकमेकांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर कापून एकमेकांच्या लेखणीचे तोंडभरून कौतुक करतांना पंचाहत्तरीतील बाबाराव मुसळे आणि पसष्टीतील इंद्रजित भालेराव...

डॉ.भास्कर बडे: शेतीमातीच्या व्यथा मांडणारा बहुआयामी सृजन!

Image
  डॉ.भास्कर बडे: शेतीमातीच्या व्यथा मांडणारा बहुआयामी सृजन!             साहित्य समाजाचा आरसा असते. कथा, कविता, कादंबरी, नाटक आदि वाङ्मय हे त्या त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींवर भाष्य करतांना नित्य जागृती करत असते. याच अनुषंगाने नव्या पिढीतील, एकविसाव्या शतकांतील बहुआयामी कवी, लेखक, कथा-कादंबरीकार, नाटककार, वावर प्रकाशन लातूरचे मालक, एका वाचनालयाचे सर्वेसर्वा, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.भास्कर बडे हे आपले लेखनाचे काम मोठ्या नेटाने करत आहेत. निवृत्तीनंतर एखादा माणूस आपल्या वयाला कवटाळून घरीच हरी हरी करत बसला असता, परंतु मुळातच बंडखोर वृत्तीचे असलेले कविवर्य डॉ.बडे सरांनी प्रत्यक्ष शेती करून त्यावर आधारित जिवंत अनुभव कथन करायचे ठरवले आहे. याचा परिपाक म्हणजे बडे सरांची लेखणी ही बीड जिल्ह्यासारख्या खडकाळ परिसरात शेतीमातीची कविता लिहून कविवर्य ना.धो.महानोरांचा वसा-वारसा मोठ्या ताकदीने चालवत आहेत. आज डॉ.बडे सरांचा ६३ वा वाढदिवस असतांना सर आपल्या लोणी गावाच्या वावरात ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात मुक्क्कामी ...

फुल!

Image
फूल! सकाळी फुललेलं फूल सायंकाळी मलुल होतं हावरट, लोभी माणसाला जीवनगाणं शिकवून जातं! फुलांचा तो निरव रंग  पाहताच मन होई दंग मनी उठती अनंत तरंग मन गायी सुरेल अभंग! फुल सदा फुलविते जग काळजात घेऊन नित्य धग पूर्वेला फुले सूर्यफूल असे हे सदा जागवी जीवसृष्टी सजग! जन्मताच जन फुले वाटती गृहस्थात ही फुले दाटती नित सुंदर फुलली अवनी फुलेच करती समारोप जीवनी! म्हणून सदा फुल व्हावे फुलांकडे पाहून जगावे सुखदुःख चढ उतार जगी सदा फुलांचेच गीत गावे! -प्रा.डॉ.विठ्ठल खं.जायभाये सोनपेठ जि.परभणी

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!

Image
  गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!             काळाच्या किल्ल्या कुणाच्याच हातात नाहीत! मृत्यु अटळ असून माणसाला तो कोणत्या वळणावर येऊन मिठी मारेल(?) याची अजिबात शाश्वती नाही! नियतीने कुणाच्या भाग्यात काय लिहिले आहे(?) हे कुणालाच माहित नाही, असे असले तरी इथे प्रत्येकजण आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्यासाठी धडपडतोय! याच वैश्विक न्यायाने काही माणसं आपल्या दैदिप्यमान कार्य-कर्तृत्वाने आपले जगणे-जीवन जनमानसांच्या हृदयावर आरूढ होऊन वलयांकित करतात! दुर्दैवाने नियतीला हे पहावत नाही आणि ती माणसे अचानक कालवश होतात! त्यावर कुणाचाच विश्वास बसत नाही! याचप्रमाणे महाराष्ट्राची बुलंद तोफ, संघर्षपुत्र, जनतेच्या मनावर अहोकाल अधिराज्य गाजवणारे लोकनेते, केंद्रीय मंत्री नामदार गोपीनाथराव मुंडे आजपासून बरोबर नऊ वर्षापूर्वी एका अपघाताची शिकार होतात आणि तमाम जनतेला अश्रूंच्या महासागरात ढकलून आपण जगाचा निरोप घेतात! ही दुर्दैवी घटना वर्णन करायला शब्दकोशांत शब्दच सापडत नाहीत! नेमकं काय म्हणावं या नियतीला? तो दिवस...

फौज पेटते आहे!

Image
फौज पेटते आहे! पुन्हा एकदा निळे  आभाळ फाटते आहे रणझुंजार लोकांची पुन्हा फौज पेटते आहे! अडकला इथे जो तो  आपल्याच हिशोबात कुणाशी सोयीर ना सुतक भोवताल असा सैरभैर काळीज फाटते आहे ...फौज पेटते आहे! अथांग जनसागरात माणूसच सापडत नाही शुभेच्छांचा वर्षाव आभासी खरे प्रेम आटते आहे ...फौज पेटते आहे! उठा मावळयांनो आता आठवून इतिहास पाने बना मजबूत अंतर्बाह्य पुन:प्रज्वलित करा मने बदल होईल वाटते आहे ...फौज पेटते आहे! असा काळ खडतर अंधारला भर दिवस मनाच्या खोल तळाशी क्रांती मशाल चेतते आहे ...फौज पेटते आहे! आपला प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी दिनांक:02.06.2023