फौज पेटते आहे!

फौज पेटते आहे!

पुन्हा एकदा निळे 
आभाळ फाटते आहे
रणझुंजार लोकांची पुन्हा
फौज पेटते आहे!

अडकला इथे जो तो 
आपल्याच हिशोबात
कुणाशी सोयीर ना सुतक
भोवताल असा सैरभैर
काळीज फाटते आहे
...फौज पेटते आहे!

अथांग जनसागरात
माणूसच सापडत नाही
शुभेच्छांचा वर्षाव आभासी
खरे प्रेम आटते आहे
...फौज पेटते आहे!

उठा मावळयांनो आता
आठवून इतिहास पाने
बना मजबूत अंतर्बाह्य
पुन:प्रज्वलित करा मने
बदल होईल वाटते आहे
...फौज पेटते आहे!

असा काळ खडतर
अंधारला भर दिवस
मनाच्या खोल तळाशी
क्रांती मशाल चेतते आहे
...फौज पेटते आहे!

आपला
प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी
दिनांक:02.06.2023

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!