Posts

Showing posts from May, 2023

महान योद्धा अहिल्यादेवी होळकर आणि अस्वस्थ वर्तमान!

Image
  महान योद्धा अहिल्यादेवी होळकर आणि अस्वस्थ वर्तमान!         अखंड भारत वर्षाचा दैदिप्यमान इतिहास संपूर्ण जगाला थक्क करणारा असून महाराष्ट्राच्या मातीने आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा भारताच्या ललाटी स्पष्टपणे उमटवून आपली कायम ओळख निर्माण केली आहे. मग तो १८५७ चा उठाव असो, पानिपतचा रणसंग्राम असो किंवा भारतीय स्वातंत्र्य युद्ध असो , इथला बहाद्दर मराठी योद्धा नेहमीच अग्रेसर राहिला आहे ! या सर्वच दैदिप्यमान इतिहासामध्ये स्त्रीयांचे योगदानसुद्धा तेवढेच महत्वपूर्ण आहे ! अगदी झाशीची राणी, जिजाऊ आईसाहेब यांचे योगदान इतिहासाने नोंदवून ठेवले आहे. मात्र या सर्वच लढाऊ बाण्याच्या स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे स्थान दिपस्तंभासारखे आहे ! अठराव्या शतकांत मराठ्यांच्या इतिहासामधील बाजीराव पेशव्यांचे माळवा प्रांताचे सरदार श्री मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेविंना आपली सून करून घेतले. वयाच्या ८ व्या वर्षी विवाह आणि वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. सासरे श्री मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला आपल्या मुलीसारखे सांभाळून सती जाण्यास प्रतिबंध केल...

डॉ.किशोर सानप: संत वाङ्मय अभ्यासक, साक्षेपी समीक्षक!

Image
  डॉ.किशोर सानप: संत वाङ्मय अभ्यासक, साक्षेपी समीक्षक!             संत वाङ्मयाचे दृढमूल चिंतक, आपल्या साक्षेपी समीक्षेने नव लेखक-कवींची भक्कमपणे पाठराखण करणारे, समाजातील विविध मूलगामी विषयावर कादंबरी, ललित लेखनातून भोवतालाचे डोळे उघडवणारे मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, सुप्रसिद्ध लेखक डॉ.किशोर सानप यांचे निधन झाले! आधुनिक मराठी वाङ्मय अवकाशातील एक ओजस्वी तारा निखळला! चिरेबंदी मंदिराच्या दोन शिळांच्या खिंडीतून दुर्दम्य इच्छाशक्तीने एखादा औदुंबर रुजावा आणि आपल्या थंडगार छायेने मंदिराचा संपूर्ण गाभारा शीतल व्हावा! मुळाशी ना कुठली माती ना पाणी, तरीही औदुंबर आपले काम करत राहतो! अगदी याच संघर्षशील न्यायाने डॉ.किशोर सानप सरांचे जीवनगाणे बहरत गेले. अकोला शहरात रहात असले तरी घरी परिस्थिती बेताचीच, त्यामुळे एक तरुण वयात स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडत होता. वडिलांना नौकरी नसली तरी घरी वारकरी परंपरा रुजलेली होती. त्यात आजोबा (आईचे वडील) कीर्तनकार! अगोदरचे कीर्तनकार हे आजच्यासारखे नव्हते 'उथळ पाण्याला खळखळाट भारी!' आजोबांच्या अभ्यासपूर्ण, भ...

तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान: उत्तम संग्राह्य ग्रंथ

Image
  तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान: उत्तम संग्राह्य ग्रंथ             अलीकडे मोबाईलचा सुळसुळाट आणि सर्वत्र भूलभुलैया मिडियामुळे वाचन आणि लेखन संस्कृती लोप पावत असतांना वाळवंटात मारुद्यान सापडावे त्याप्रमाणे बोटावर मोजता येतील एवढे लोक हल्ली मूलगामी चिंतन-मनन-वाचन-लेखन करून वाघिणीच्या दुधासी आपली इमानदारी जपताहेत! त्यापैकीच एक असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रंगकमी, पत्रकार, प्राचार्य, संशोधक, संपादक, फिल्म-माहितीपट निर्माते, व्यासंगी लेखक, फर्डे वक्ते असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे मराठवाड्याच्या मातीत जन्मून कोल्हापूरच्या मातीत रुजलेले पुरोगामी विचारवंत, निवृत्त प्राचार्य डॉ.बाबा बोराडे यांनी नुकतेच 'तीर्थंकर भगवान महावीर वर्धमान' हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. श्री मिलिंद काटे यांच्या अनुराधा प्रकाशन प्रकाशित या महत्वपूर्ण ग्रंथाचे जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन होत आहे.             अनुराधा प्रकाशन हे महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद...

प्रज्ञावंत प्रेणास्त्रोत: शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले !

Image
  प्रज्ञावंत प्रेणास्त्रोत:  शिवपुत्र  छत्रपती संभाजी राजे भोसले !             मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही! हवा-सूर्यप्रकाश अभावाने त्याची वाढ खुंटते, परंतु काही झाडं ही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आपली वाढ खुंटू देत नाहीत! हाच निसर्ग नियम माणसांच्या बाबतीत सुद्धा आहे. मोठ्या माणसांची संतती आपल्या पूर्वजांच्या कार्य-कर्तृत्वाला न्याय देवू शकत नाही किंवा आपल्या वाड-वडिलांच्या किर्तीमानाखाली त्यांचे अस्तित्व नगण्य होते, परंतु यालाही काही युगपुरुष अपवाद आहेत! जेंव्हा संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य-कर्तृत्वाने प्रकाशमान झालेला असतांना, आपल्या वडिलांसोबत अनेक मोहिमांमध्ये सहभागी झालेले शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी अगदी आपल्या वडिलांची मिराशी मोठ्या ताकदीने पुढे नेली आणि भोसले घराण्याच्या इतिहासामध्ये   छत्रपती संभाजी राजे भोसले हे नाव सुद्धा इतिहासकारांना सुवर्णाक्षरांनी लिहायला भाग पाडले!             जिजाऊ मां...

सदैव आनंदाचा सोपा राजमार्ग!

Image
  सदैव आनंदाचा सोपा राजमार्ग!           स्वतः साठी जसे आहात तसेच रहा.  कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार.  म्हणून लोकांचा विचार करत जावू नका. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतंच नाही. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो. संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा. आयुष्य आणि पुस्तकातले व्याकरण सारखेच असते. शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्याच बिघडतं. डोक्यावरील मनातील सर्व भार ईश्वरावर सोपवा व दिवसभरात ज्यांनी मदत केली त्यांना धन्यवाद द्या. ज्यांनी त्रास दिला त्यांना मोठ्या मनाने माफ करून बिनधास्त झोपा. बघा किती छान झोप लागेल व उद्याची सकाळ नव्यानेच प्रसन्न अनुभवयास मिळेल. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारा मोठा दृष्टिकोन ठेवा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होणार नाही. उगवता सूर्य आणि मावळता सूर्...