Posts

Showing posts from September, 2023

कृतीशील समाजसुधारक श्री संत भगवानबाबा

Image
कृतीशील समाजसुधारक श्री संत भगवानबाबा             "तैसा व्यासाचा मागोवा घेतु" या संत ज्ञानेशांच्या प्रेमानुभूतीनुसार जेष्ठ-श्रेष्ठांचा मागोवा घेऊनच जीवनाची खडतर वाट सुकर करण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित आहे. आधुनिक काळात अनेक सामान्यांतील सामान्य माणसांनीच असामान्य इतिहास घडवला आहे ! आजमितीला कुणीही कुणाला तुच्छ लेखू नये अथवा आत्मक्लेश करून घेऊ नये. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये, दिवटीच्या आंगीं थोरी   |   तरी ते बहु तेज धरी   | वाती आपुलिया परी   |   आणीच कीं ना   ?   ॥ ह्या ओव्यांच्या द्वारे दिवटी असो की वात, आपापल्या परीने प्रकाश देण्याचे कार्य करत असते असा उपदेश करतात. याच न्यायाने महाराष्ट्राच्या दुर्गम, मागास आणि उसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सामान्य कुटुंबात कृतीशील समाजसुधारक राष्ट्रसंत भगवानबाबांचा जन्म झाला. बीड जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील विविध नद्यांच्या उगम-संगमावरील सुप्पे सावरगावात श्रावण वद्य पंचमी, शके 1818 (29 जुलै, 1996) सोमवार रोजी सूर्योदय समयाला सौ.कौतीकाबा...