Posts

Showing posts from October, 2024

प्रज्ञावंत प्रेषित: भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

Image
  प्रज्ञावंत प्रेषित: भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम         जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर म्हणतो, "काही माणसं जन्मताच महान असतात, काही कठीण परिश्रमाने महानता प्राप्त करतात आणि काहींवर महानता लादली जाते." या व्यक्तीमत्वापैकी दुसऱ्या वर्गात बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! आधुनिक भारताच्या इतिहासात भारतीय तरुण-मध्यमवर्ग-बुजुर्ग स्त्री-पुरुषांच्या मनावर सर्वार्थाने अधिराज्य गाजवणारी व्यक्तिमत्व दुर्मिळच! अशाच प्रकारच्या व्यक्तीमत्वांपैकी वीस-एकविसाव्या शतकांतील महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! जवळपास ८३ वर्षे त्यागपूर्ण आयुष्य जगलेले गुरुवर्य डॉ.कलामांचा जीवनपट सर्वांनाच थक्क करणारा आहे!             भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांच्या जगप्रसिद्ध अगीपंख (जडणघडण) या आत्मचरित्रातील काळजी नको, क्षोभ नको, खंत नको संधीची नुकतीच कुठे सुरुवात आहे सर्वोत्तम ते अजून सुरु व्हायचे आहे अजून मी सर्वोत्तम केलेले नाही! ओळी त्यांची दुर्दम्य इच्छाश...