कृतीशील समाजसुधारक: श्री संत गाडगेबाबा
कृतीशील समाजसुधारक: संत गाडगेबाबा महाराष्ट्राची वैविध्याने नटलेली समृद्ध, बहुआयामी सर्वश्रुत संस्कृती अनेक विचारवंत समाजधुरिणांच्या कृतीपरायण कार्यशैलीने झळाळून निघाली आहे ! निश्वार्थी प्रेम, त्याग आणि त्याला कृतीशील विचारांची जोड देऊन महाराष्ट्र आचार-विचार संपन्न राज्य म्हणून नव्या विश्वात आपली वेगळी ओळख कायम टिकवून आहे! अनेक विचारवंत, समाजसुधारक आणि विविध धर्म, संप्रदायातील संतांनी येथील पावन भूमीला आपल्या समाजोद्धारक कार्याने सिंचित करून नव्या विचारांची कृतीशील जोड देऊन महाराष्ट्राची कीर्ती गगनाला भिडवली आहे ! अशा महान कृतीशील, समाजशील संत-विचारवंतापैकी एक कृतीशील समाजसुधारक संत म्हणजे संत गाडगेबाबा ! गाडगेबाबा हे नावच त्यांच्या संपूर्ण कार्यशैलीची उत्तुंग ओळख आहे ! महाराष्ट्राची त्यागाची आणि निश्वार्थी कार्यसंस्कृतीची ओळख अनेक संतांनी आपल्या कृतीने जगाला दाखवून दिली आहे आणि त्याचा वसा आणि वारसा घेऊन संत गाडगेबाबांनी उच्चकोटीचे दैदिप्यमान कार्य केलेले आपणांस दिसून येते ! संत विटप सरिता गिरी धरणी । परहित हेतु सबन्हकी करणी ।। या सुभाषिताप्रमाण...