उसवण: गरिबी, सत्वशील जीवनाचा विदारक दाह!
समीक्षण युवा साहित्य अकादमी २०२४ पुरस्काराने सन्मानित कादंबरी... उसवण ---श्री देविदास सौदागर प्रकाशक: देशमुख अँड कंपनी लि.पुणे उसवण: गरिबी, सत्वशील जीवनाचा विदारक दाह! अक्षरे माणसाला अस्वस्थ करतात. प्रत्येकामध्ये विचार लाव्हा खदखदत असतो. त्यात एकीकडे काही माणसं स्वतःशी संवाद करतात, तासंतास मोबाईलच्या निर्जीव, गुळगुळीत काचेसोबत व्यर्थ खेळत असतात. दुसरीकडे चिंतनशील माणसं सरळ लेखणी उचलतात आणि आपल्या मनातलं लिहायला बसतात. लेखन हे सहजासहजी होत नाही. खळबळ, मध्ये भरपूर साठलेलं, इतरांना सांगायचं राहिलेलं असतं आणि त्यातूनच ते भडभडून बाहेर येतं. आज मोबाईल-मीडियामुळे नवनवीन लिहिणारे लोक माहित होऊ लागले, नवलेखकांचे समूह तयार झाले. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत निघाली. मी मी म्हणणाऱ्यांना मिडीयावर यावे लागले. लेखन क्षेत्रातील ही नव क्रांतीच म्हणावी लागेल! यातून दिवसेंदिवस दर्जेदार वाङ्मय निर्माण होत आहे, ते प्रकाशात येत आहे. नव्या लेखकांची ओळख होत आहे. नवनवे लोक वाचत, लिहीत आहेत. त्यातूनच कालपरवा तुळजापूर येथील टेलर, कविवर्य ...