Posts

Showing posts from August, 2024

मैत्र जिवाचे...!

Image
  मैत्र जिवाचे...!       माणूस हा भावनाशील प्राणी आहे. भावनांचे बीज पेरत जीवन फुलवीत जाणारा माणूस जगभर संचरला आहे. यातूनच एक घट्ट धागा विणला गेला आहे आणि तो कोमल, सुंदर , हृदयंगम धागा म्हणजे मैत्री! आत्तापर्यंत आणि इथून पुढेही मैत्रीवर अनेक कथा, कादंबरी, काव्य, नाटके निर्माण झाली, होत राहतील! मैत्रीची अनेक उदाहरणे जगणे पहिली आहेत. स्वतःपेक्षाही मित्राची काळजी घेणारे मित्र आणि त्यांच्याद्वारे मैत्री अजरामर झाली आहे. मैत्री म्हणजे समर्पण! मैत्री म्हणजे नवजीवन! मैत्री म्हणजे श्वास आणि उच्छवास! आत्तापर्यंत मैत्रीनेच जग जुडले आहे. सत्ता, संपत्ती, वय, जात, धर्म, पंथ, लिंग, देश इत्यादींच्या पलीकडे एक अलौकिक भावनाविष्कार म्हणजे मैत्री! मैत्री म्हणजे आधार! मैत्री म्हणजे शुद्धता, निर्मळता! मैत्री प्रेमाच्याहि पलीकडचे अवीट नाते. मैत्री, जिथे सर्व मानवी बंध अनिर्बंध होऊन ओसंडून वाहतात तेथून मैत्रीचा निखळ प्रवाह वाहत असतो.       मैत्रीवर अनेकांनी आपले अनमोल, चिंतनगर्भ शब्द खर्च करतांना जीवनात मैत्रीला अनन्यसाधारण महत्व दिलेले आढळून येते. स्व...