Posts

Showing posts from March, 2023

तुकाराम बीज विशेष: जगद्गुरू तुकोबांचा अमृतोत्सव!

Image
जगद्गुरू तुकोबांचा अमृतोत्सव!                 स्वतःचे मरण डोळ्याने पाहून आपल्या संघर्षशील जगण्याचा अमृतोत्सव साजरा करणारा एकमेवाद्वितीय संत कवी म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम! संसारात राहून, भोवतालच्या माणसांशी वागून अभंग-कीर्तनातून लोकव्यवहार कथन करणारा सामान्यातील असामान्य महापुरुष तुकोबाराय! जेमतेम बेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभेलेले तुकाराम काय काय लिहून-बोलून जातात? समोरील आव्हानांचा भलामोठा पहाड आणि संघर्षातून दिलेली उत्तरे म्हणजे तुकारामोत्तर लोकांच्या जीवनाला अजीवन पथगामी ठरणारी आहेत. सतरावे शतक, कडेकोट वर्णव्यवस्था यातून मोठ्या कौशल्याने मार्ग काढत तुकोबा पुढे जातात. आपले अभंग बुडविले तरी कुणालाही एक शब्द न बोलता ज्यांच्यासाठी लिहिले होते त्यांच्याकडेच जाऊन आपली कैफियत मांडतात. त्यांचे अभंग खऱ्या अर्थाने अभंगच राहिले, कारण ते लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले. आलेले अनुभव सरळ, साध्या लोकभाषेत कथन करून समाजमंथन करण्याचे महत्कार्य तूकोबांनी केल्यामुळेच जनसागराच्या मनपटलावर अभंग तरले आणि त्यानंतर खराखुरा तुक...

'ती'च्याशिवाय सारेच सुन्य!

Image
              जन्म म्हणजे विश्वातील अलौकिक आणि सर्वश्रेष्ठ भेट! ही अनमोल भेट आपल्याला विनामुल्य मिळाली ती आईकडून! जगाचं भरण-पोषण करणारी माती आणि नवजीवन देणारी माता यांचं मोल कोणताही जवाहीर करू शकत नाही! या दोघींचे मूल्य आणि मोजदाद करणारे मापदंड आणि मोजणीयंत्र सूर्य चंद्र असेपर्यंत सापडणे दुरापास्तच! म्हणूनच   'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी'   यात माता आणि माती या दोनच स्वर्गापेक्षा महान आहेत असे गौरविले आहे. जी विविध रूपांनी माणसाचं जगणं आणि वागणं समृद्ध करते ती स्त्री! तिची विविध रूपं आणि योगदान आज विविध अंगांनी मुल्यांकित होऊन 'ती'ला जीवन तत्वांनी वलयांकित करणे अपेक्षित आहे.               अगदी प्राचीन कालापासून स्त्रीचा सन्मान होत आला आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।। जिथे स्त्री सन्मानित होते तिथेच खऱ्या अर्थाने ईश्वरपूजा होते, आणि जर ती अपमानित होत असेल तर सर्वकाही निरर्थक! स्त्री कुटुंबाचा कणा असते. नेहमी तीचा निर्णय आणि सल्ला कुट...

कविता: निसर्ग!

Image
निसर्ग! रंग कोवळे पिवळे पिवळे मोद संचारला चोहीकडे कोमल किलबिल पक्षांची बहरला आनंदी आनंद गडे हर्ष पालवी फुलून आली चिऊताई ही भुर्रकन उडे मंद गंधळला आंबे मोहर मनी मानसी हा कैफ चढे नको संगीत कर्णकर्कश ते निसर्ग ऐकवतो मंजुळ धून कोमल झुळूक स्पर्श असा आनंद पसरला ओसंडून नका मागू काही गडयांनो मनी आनंद ओतप्रोत भरा नाचा, बागडा मनसोक्त निसर्ग कृतज्ञ नित्य स्मरा प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी