क्रिकेटचा सामना हरलोय, युद्ध नाही!
क्रिकेटचा सामना हरलोय, युद्ध नाही ! एक मराठी चित्रपट येऊन गेला, त्याचं शीर्षक होतं 'येडयाची जत्रा'. आज आपली सर्वांची अवस्था म्हणजे जणू येड्यांच्या जत्रेसारखी झालेली आहे. चित्रपटांत लेखक-दिग्दर्शकांना जो संदेश द्यायचा तो राहिला बाजूला आणि अक्षरशः आज लोक वेडे झाले झाले वेडे ! माणसाला कशाचं वेडं लागावं ? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात देशातील तरुणांना कशाचं वेड लागलं पाहिजे ? ध्येयाचं, यशस्वी होण्याचं, बुद्धिमान, बलशाली, कीर्तिमान आणि महापुरुष्यांच्या चरित्र वाचनाचं, वचनांचं वेड लागणं अपेक्षित आहे. एकेठिकाणी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद म्हणतात, "हे वीर युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. राष्ट्राला युवा चेतनेची आवश्यकता आहे. उठा स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा हाच क्षण आहे. जोवर तुम्ही थकलेले नाहीत तोवर निश्चय करा. श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आदर्शासाठी सर्व समर्पण करा." हा दुर्दम्य आशावाद आणि हीच नवचेतना घेऊन देशाचा तरूण मार्गस्थ झाला पाहिजे. असेच तरुण देशाला तारुण नेऊ शकतात. परंतु आज भोवताल काय पाहतोय आपण ? ...