फुल!
फूल!
सकाळी फुललेलं फूल
सायंकाळी मलुल होतं
हावरट, लोभी माणसाला
जीवनगाणं शिकवून जातं!
फुलांचा तो निरव रंग
पाहताच मन होई दंग
मनी उठती अनंत तरंग
मन गायी सुरेल अभंग!
फुल सदा फुलविते जग
काळजात घेऊन नित्य धग
पूर्वेला फुले सूर्यफूल असे हे
सदा जागवी जीवसृष्टी सजग!
जन्मताच जन फुले वाटती
गृहस्थात ही फुले दाटती
नित सुंदर फुलली अवनी
फुलेच करती समारोप जीवनी!
म्हणून सदा फुल व्हावे
फुलांकडे पाहून जगावे
सुखदुःख चढ उतार जगी
सदा फुलांचेच गीत गावे!
-प्रा.डॉ.विठ्ठल खं.जायभाये
सोनपेठ जि.परभणी
Comments
Post a Comment