राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान
राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान माणूस नावाचा प्राणी शेवटपर्यंत माणसाला कळला तर ते जगातील सर्वात मोठे संशोधन असेल! कितीही प्रयत्न केले तरी माणसातील विकार संपतील का? हा प्रश्न अनेक महामानवांनी, दर्शनीकांनी उपस्थित केलेला आढळून येतो. माणूस मोठा स्वार्थी आणि मतलबी असल्यामुळे त्याने आत्तापर्यंत सृष्टीतील सर्वच गोष्टींचा केवळ त्याच्या स्वार्थासाठी पुरेपूर उपयोग केलेला दिसतो. त्यातच एखाद्या महापुरुषाला देव केले, त्याची मूर्ती करून मंदिरात प्रतिष्ठापना केली, त्याची पूजा - अर्चा, आरती झाली की माणूस त्याला हवं तसं काम करायला आणि त्या मूर्तीचा हवा तसा उपयोग करायला मोकळा! कोणत्याही गोष्टीचे धर्माच्या नावाखाली भावनिक चित्रण केलं की भोळी, भाबडी, साधी, निरागस, देवाला भिनारी बिचारी माणसं देवाच्या नावाखाली जे सांगाल ते ऐकायला आणि करायला तयार. असं असलं तरी आज राज्यात होणाऱ्या किळसवाण्या घटना पाहून मन प्रचंड व्यथित होतं. उच्चशिक्षित, उच्चभ्रू, श्रीमंत कुटुंबातील आणि विविध राजकीय आणि शासकीय पदावर असलेल्या लोकांनी आपला विवेक अक्षरशः थोतांड आणि कर्मकांड या समोर गहाण टाकलेला पाहून मन विषन्न, व्यथीत होत...