Posts

Showing posts from July, 2023

म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे...!

Image
  म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे...         विस्तीर्ण, विशालकाय पसरलेल्या पर्वतावरील एकाकी पडलेल्या पाषाणाला एक शिल्पकार आपल्या छन्नी-हातोडा आणि अलौकिक कल्पकतेच्या सहाय्याने मूर्तीचे रूप देऊन मंदिरात केवळ पूजा करण्यायोग्य बनवत नाही, तर त्या दगडामध्ये लाखो ज्ञानी-प्रज्ञावंत माणसांना त्यांच्या जागृत श्रद्धा आणि यशासाठी सजीव प्रतिक निर्माण करतो ! हाच खरा गुरु ! हेच गुरुचं खरं गुरुत्वाकर्षण ! गुरुचं गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षाही जास्त प्रवाही, जे जीवनातील कण-कण आणि क्षण-क्षण व्यापून टाकतं ! यामुळेच कि काय, कुणी कितीही महान-प्रतिभावंत-श्रीमंत-गुणवंत आणि कोणत्याही पदांवर विराजमान असला तरी क्षणार्धात गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो ! गुरु नेमकं आपल्या शिष्याला काय देतो बरं ? हा मोठा कळीचा प्रश्न आहे. याचं उत्तर म्हणजे, गुरु शिष्याला काहीच देत नसून केवळ शिष्यातील लघुतत्व संपवतो आणि त्यालाच गुरुस्थानी विराजमान करतो ! तोच खरा गुरु ! गुरु म्हणजे कुणी कानात फुंकणारा, बंदिस्त करून लोकांना गुह्य ज्ञान सांगणारा नसून 'गुह्य लोकांती प्रकट करणारा'च खरा...