असा वेचला मनसोक्त प्राजक्त...

 


असा वेचला मनसोक्त प्राजक्त

शांत सुरम्य मन प्रशांत पहाटे
किलबिल कोकीळ गाते गाणे
खुलला प्राजक्त सांडला दारात
मन पाखरू होते सुगम तराने

शुभ्र शुभ्र अशी पाकळी उमले
बहरला हा केशर रंग पाठी देठ
हर्ष उल्हासित असा उमलून येई
तनामनाची अलौकिक गंध भेट

असा बहरला प्राजक्त बावरा
तव वर्षावात प्रेम येई बहरुन
हृदयंगम पसरे मंद धुंद सुगंध
जीवन, जगणे जातसे बावरून

असा वेचला मनसोक्त प्राजक्त
क्षण क्षण कसा मस्त जगण्याचा
आनंदावा माणूस आसमंत सारा 
सर्वोत्तम क्षण मंदिरी मागण्याचा

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!