कविता: निसर्ग!
निसर्ग!
रंग कोवळे पिवळे पिवळे
मोद संचारला चोहीकडे
कोमल किलबिल पक्षांची
बहरला आनंदी आनंद गडे
हर्ष पालवी फुलून आली
चिऊताई ही भुर्रकन उडे
मंद गंधळला आंबे मोहर
मनी मानसी हा कैफ चढे
नको संगीत कर्णकर्कश ते
निसर्ग ऐकवतो मंजुळ धून
कोमल झुळूक स्पर्श असा
आनंद पसरला ओसंडून
नका मागू काही गडयांनो
मनी आनंद ओतप्रोत भरा
नाचा, बागडा मनसोक्त
निसर्ग कृतज्ञ नित्य स्मरा
प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि.परभणी

ऋतू बदलाची दखल घेणारी सुंदर शब्दकढिळा आणि कविताही सुंदरच महोदय !
ReplyDeleteअभिनंदन !
🌺