गुरुजींची अभाळमाया!


काल माझी कार्तिक पौर्णिमा सुफळ झाली! तब्बल 20 वर्षानंतर आदरणीय गुरुवर्य प्रा.इंद्रजित भालेराव सरांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. आजही तीच माया, तोच बाज आणि तसंच निखळ खळखळणारं प्रेमळ, लाघवी हसणं आणि बोलणं! काही माणसांना पहाता क्षणीच त्यांचं दर्शन घ्यावं वाटतं आणि बोलायला लागले की फक्त ऐकतच रहावं वाटतं असे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या महाराष्ट्र देशाची शान असलेले माझे गुरुजी इंद्रजित भालेराव! नावात सर्वकाही असतं याचं मूर्तिमंत बोलकं उदाहरण म्हणजे भालेराव सर! सतत माणसांच्या घोळक्यात विरंगुळत राहणारं विलोभनीय देखणं सौंदर्य म्हणजे भालेराव सर! कमी वेळात किती बोलले सर? काल भेटून विशेष आनंद झाला तो म्हणजे सर आत्मचरित्र लिहीत आहेत! ही मराठी साहित्यक्षेत्रासाठी खूप मोठी ठेव राहणार आहे! त्यांची भ्रमंती, व्यासंग, वाचन, सहज प्रसवणारी सोज्वळ वाणी आणि ते शब्द लालित्य कोणत्यापन शहण्याला वेड लावील अशीच! किती लिहावं आणि काय काय लिहावं हेच सुचत नाही! त्यांच्या अर्धांगिनींनी सौ गया मॅडम यांनी हा खजाना खरंच फार जपला आहे. काल त्यांचंही दर्शन झालं. आणि निघतांना सरांनी 'सुगीभरल्या शेतातून' आणि 'चिंतनीतले चिंतन' हे दोन पुस्तकं मला आशिर्वाद म्हणून दिले! काल लिहायची, वाचायची आणि बोलायची आभाळभर प्रेरणा घेऊन मी सरांच्या घरून निघालो. काही मिनिटांचा सहवास काही वर्षे लिहण्या-जगण्याची प्रेरणा झाला! शेवटी सरांना माझ्या गाडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सोडले आणि 'कृत कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो' ही काळीजभर भावना घेऊन पुढे कीर्तनाला निघून गेलो आणि सुंदर किर्तन झाले!
धन्यवाद गुरुजी!👏💐

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजा श्रीरामचंद्र आणि वर्तमान

फुल!

गोपीनाथ मुंडे: अमोघ वक्तृत्व, अद्वितीय लोकनेता!